अजनाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मा आमदार दीपक आबा साळुंखे पाटील गटाच्या दिपाली लाडे यांची बिनविरोध निवड...
सांगोला :सचिन धांडोरे:
अजनाळे ता (सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मा आमदार दीपक आबा साळुंखे पाटील गटाच्या दिपाली लाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतिश बाजी करत गुलालाची मुक्त उधळण करत जल्लोष करण्यात आला.
यापूर्वीचे सरपंच अनिता पवार यांचा ठरलेला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा देऊन लोकशाही परंपरा जपली नव्या सरपंच निवडसाठी जाहीर झालेल्या प्रक्रियेत दिपाली लाडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. विरोधी अर्ज नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र जाधव यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी संदिप सरगर,सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजय दादा येलपले, प्रा हणमंतराव कोळवले, उपसरपंच दत्तात्रय(बापु) कोळवले,हमुनाना येलपले, माजी सरपंच अर्जुन कोळवले, माजी उपसरपंच अर्जुन येलपले, विठ्ठल कोळवले, पंचायत समितीच्या माजी सभापती राणीताई कोळवले, बाळासो लाडे,माजी सरपंच अनिता पवार, संतोष शिंदे, तेजस्विनी चव्हाण, सुभद्रा कोळवले, महादेव भंडगे, रेशमा भंडगे, पांडुरंग लाडे, लक्ष्मण येलपले, नितीन येलपले, महादेव लाडे, अनिल लाडे, प्रकाश येलपले, चंद्रकांत कोळवले, मधुकर पुजारी, संभाजी कोळवले, लक्ष्मण गुरव, आगतराव लिगाडे, सुरेश शिंदे, सुहास शिंदे, सागर कदम, पांडुरंग कुरे,ग्राम महसूल अधिकारी पोर्णिमा काशीद, पोलीस पाटील संतोष भंडगे, महसूल सेवक नवनाथ इंगोले यांच्यासह अन्य मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी पोलीस कॉन्स्टेबल संजय भानवसे व पठाण यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
"अजनाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. दिपाली बाळासो लाडे यांची झालेली निवड ही गावासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कार्यक्षम, प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे अजनाळे गावाच्या विकासाला नवी चालना मिळेल, असा मला विश्वास आहे. ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण करत गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्या निश्चयाने प्रयत्न करतील. त्यांच्या कार्यकाळासाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो."
— मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मा आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, मा आमदार शहाजी बापू पाटील, डॉ अनिकेत (भैय्या) देशमुख ,चेतनसिंह(बाळासाहेब) केदार या नेते मंडळीच्या प्रयत्नाने व गावातील सर्व नेतेमंडळींच्या सहकाऱ्यांने जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासास पात्र राहुन गावातील सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन गावाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे.
नूतन सरपंच दिपाली बाळासो लाडे
अजनाळे ता सांगोला
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्या नाहीत