Breaking News

न्यू राष्ट्रीय समाज पक्ष व समता परिषदेतर्फे सांगोला तालुका वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर


सांगोला प्रतिनिधी 
       कोळेकर महास्वामी मठाचे प्रसिद्धीप्रमुख, लिंगायत महासभेचे सांगोला तालुका अध्यक्ष, सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष,, सीबीएस न्यूज चैनल चे कार्यकारी संपादक, पेन्शनर संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख इत्यादी विविध पदावर कार्यरत असलेले रविराज शेटे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वांना योग्य दिशा देण्याचे कार्य केल्याबद्दल न्यू राष्ट्रीय समाज पक्ष व समता परिषद सांगोला यांचे तर्फे आदर्श     
पत्रकार म्हणून शाल, प्रशस्तीपत्र, ट्रॉफी देऊन सदानंद हॉटेल सांगोला येथे गौरविण्यात आले आहे. 
        सदर प्रसंगी समता परिषदेच्या प्रदेश सरचिटणीस डॉक्टर स्नेहा ताई सोनकाटे, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष इंजिनिअर रामचंद्र घुटुकडे, ओबीसी नेते प्रा. आर वाय घुटुकडे, डिजिटल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शंकरराव लिंगे, ओम काली हिंदवी स्वराज्य सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष उल्हास दादा धायगुडे पाटील, समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन घेरडे, समता परिषदेचे अध्यक्ष मधुकर माळी, सूर्यकांत आधाटे, सीमाताई एखतपुरे, भैरवनाथ बुरांडे, अमोल माळी, चंद्रशेखर जाधव, सीबीएस न्यूज चैनल चे सहसंपादक शशिकांत भाऊ कोळी, इ. इत्यादींच्या उपस्थितीत रविराज शेटे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत