चिंध्या पीर बस स्थानकाची दुरावस्था...! महिला, विद्यार्थी, नागरिकांचे हाल.. लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे...
सांगोला प्रतिनिधी
सांगली, सोलापूर सीमारेषेवर असलेले चिंध्यापीर एसटी बस स्थानकाची दुरावस्था झाल्याने प्रवाशांना, ऊन, वारा, पावसामध्ये थांबणे अवघड झाले असून, यामुळे महिला, विद्यार्थी, बाळ गोपाळ व नागरिकांचे हाल होत असून, नवीन बस स्थानक उभे करावे व यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे असे नागरिकात बोलले जात आहे.
सोलापूर, सांगली या सीमारेषेवर हे बस स्थानक पडलेल्या अवस्थेत असून, दोन्ही जिल्ह्यातील नागरिक या बस स्थानकाचा आश्रय घेतात व नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना आटपाडी, सांगली, सांगोला, सोलापूर येथे जाण्यासाठी हे निवारा शेड गरजेचे होते परंतु त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने विद्यार्थी, महिला, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे तरी पावसाळ्यात निवारा शेड उभे करून गैरसोय दूर करावी व या कामी लोकप्रतिनिधींनी ताबडतोब लक्ष द्यावे असे नागरिकात बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत