वाढेगांव येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती संपन्न
सांगोला प्रतिनिधी
वाढेगांव ता. सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ वाढेगांव यांच्यावतीने जि.प. शाळा वाढेगांव येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे होते तर अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार नितीन जाधव हे होते.
सुरुवातीस प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष सुभाष कांबळे, मार्गदर्शक आण्णासो गस्ते, गोरख भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच महसूल सहाय्यक सचिन कुंभार,पोपट काळे, नरेश बनसोडे, संजय डोईफोडे, उपसरपंच शिवाजी दिघे, तानाजी भोसले, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष समाधान सूर्यगंध, शिवाजी सूर्य गंध यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मा. केंद्रप्रमुख वसंतराव दिघे यांनी केले तर उपसरपंच शिवाजी दिघे, वैजनाथ काका घोंगडे, शिक्षक शिवाजी भोसले, नायब तहसीलदार नितीन जाधव इ.नी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आरोग्य शिबिर व हिमोग्लोबिन शिबिर आयोजित करा तसेच साठ वर्षावरील नागरिकांची आपण अँजिओग्राफी व अंजू प्लास्टिक आपण मोफत करण्याचा मनोदय व्यक्त केला तसेच शाळेत कंपाउंड करू असे सांगितले.
सदर कार्यक्रमास मा.सरपंच गणेश शिनगारे, दादासो दिघे, मॅनेजर संतोष चौगुले, नारायण दिघे, इरफान मुलानी, दत्ता शिनगारे, ग्राम. सदस्य सागर ऐवळे, बाळासो हजारे, पोपट हजारे, चंद्रकांत पाटील, मोहन सूर्य गंध, चंद्रकांत मोरे, रजनीकांत सूर्य गंध, चंद्रकांत सूर्य गंध, मच्छिंद्र भोसले, शशिकांत कांबळे, नवनाथ भोसले, ज्ञानेश्वर गस्ते, अनिल फाळके, शहाजी भोसले, दयानंद गस्ते, शिवाजी गस्ते, बाळासोगस्ते, अक्षय गस्ते, गणेश गस्ते, मनोहर गस्ते, बापू गस्ते, अमोल गस्ते, रोहित गस्ते, बबलू गस्ते, महेश फाळके, अतुल गस्ते, दत्तात्रेय जावीर, अरुण गस्ते, तुकाराम गस्ते, शिक्षक तांबोळी, बाबर, डांगरे, राजगुरू, बोत्रे इ. च्या उपस्थितीत वृक्षारोपण ही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव दिघे यांनी तर आभार मुख्याध्यापक विजय इंगवले यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत