Breaking News

अण्णाभाऊ शोषितांसाठी लढणारे साहित्यिक होते.. रामचंद्र बनकर


 सांगोला प्रतिनिधी 

        लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी 37 कादंबऱ्या, 19 कथा संग्रह, 14 लोकनाट्य, अकरा पोवाडे, तीन नाटके, शेकडो गाणी, लावण्या लिहून यामधून वंचित, शोषित घटकांचे विचार मांडले व त्यामुळे ते खऱ्या अर्थाने शोषितांसाठी लढणारे साहित्यिक होते असे मत क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक रामचंद्र बनकर यांनी अण्णा भाऊंच्या जयंती प्रसंगी सांगोला पतसंस्थेत मत व्यक्त केले. यावेळी प्रतिमेचे पूजन इंजिनियर मधुकर भडंगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच नाजरे शाखेतीही अण्णाभाऊंच्या प्रतिमीचे पूजन करण्यात आले. 


       संघर्ष हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा प्राणबिंदू होता, सर्व कष्टकरी, दलित, शोषित, पीडित  यांचे शोषण संपवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला असे मत सीईओ गणेश माळी यांनी यावेळी सांगितले. सदर प्रसंगी चंद्रकांत बनकर, राजू पोरे, रविराज शेटे, बाळासो बनकर, वैजनाथ अडसूळ, कृष्णदेव गोडसे, अभिजीत बनकर, विनायक नारनवर, योगेश बनकर, तुषार बनकर, सचिन स्वामी, सौ जयश्री अडसूळ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत