Breaking News

विकास विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी


 अजनाळे :सचिन धांडोरे:

 विकास विद्यालय, अजनाळे येथे थोर समाजसुधारक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य प्रवर्तक लोकमान्य  टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण विद्यालयाचे प्राचार्य रमेश सोनवले सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली.

प्राचार्य रमेश सोनवले सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य, कला आणि लोककलेच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित घटकांना आवाज दिला. त्यांनी दलित, शेतकरी आणि कामगारांच्या समस्या आपल्या कथांमधून प्रभावीपणे मांडल्या. त्यांचे जीवनकार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे.

तसेच, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच या घोषणेद्वारे स्वातंत्र्य चळवळीला नवे बळ देणारे नेते होते. शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान अमूल्य असून त्यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा रमेश येलपले यांनी मानले या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत