तेज पृथ्वी ग्रुप च्या वतीने महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संघटनेच्या इंदापूर तालुका पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न.
विशेष प्रतिनिधी , संतोष कदम.
वालचंदनगर :- तेज पृथ्वी ग्रुप च्या वतीने महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष शिवाजी (आप्पा) पवार, प्रसिद्धीप्रमुख अतुलजी सोनकांबळे व सदस्य संतोष कदम यांचा सन्मान तेजापृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ. अनिताताई खरात यांच्या हस्ते शाल, पेन , नोटबुक देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी नानासाहेब खरात, सद्दाम बागवान, विशाल म्हेत्रे, ओंकार सुतार, स्वप्निल शेंडे व तेज पृथ्वी ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तेज पृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा सौ. अनिताताई खरात म्हणाल्या , लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते, समाजात अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे व चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी देण्याचे काम नेहमी पत्रकार बांधव करत असतात. त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून तेज पृथ्वी ग्रुपच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. व भविष्यातही त्यांनी समाजासाठी असेच काम करत राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमामुळे आम्हा पत्रकारांना प्रोत्साहन मिळाले असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाला मान्यता मिळाली, असे महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष शिवाजी (आप्पा) पवार यांनी सांगितले व तेज पृथ्वी ग्रुपचे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत