Breaking News

विकास विद्यालय अजनाळे येथे नागपंचमी उत्सवानिमित्त विविध उपक्रम


अजनाळे सचिन धांडोरे:
नागपंचमी निमित्त विकास विद्यालय, अजनाळे येथे उत्साहात विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पतंग स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, फुगडी तसेच पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पतंग आकाशात झेपावून स्पर्धा रंगवली, तर मुलींनी मेहंदीच्या नाजूक व कलात्मक रचना साकारल्या. फुगडी व पारंपरिक खेळांतून नागपंचमीचा उत्सव आणखी रंगतदार झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. शेवटी विजेत्यांना पारितोषिके देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक आर ,व्ही सोनवले यांनी दिली.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत