विकास विद्यालय अजनाळे येथे स्व. आमदार गणपतराव देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
अजनाळे;सचिन धांडोरे ;
सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त विकास विद्यालय अजनाळे येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद (दादा) येलपले, प्राचार्य रमेश सोनवले, बाबुराव येलपले, शामराव लाडे, चंद्रकांत शेंबडे ,आप्पाराव धांडोरे सर यांच्यासह अन्य शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सहशिक्षक रमेश येलपले सर यांनी स्व. गणपतराव देशमुख यांच्या कार्य, विचारसरणी व समाजहितासाठी केलेल्या योगदानाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत