Breaking News

राज्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षकांना ५ सप्टेंबर शिक्षक दिना पर्यतं पेन्शन विक्री व उपदान रक्कम देण्यात येईल - शरद गोसावी शिक्षण संचालक पुणे..! राज्यातील ५० ते ६० शिक्षकांच्या वारसांना ३० कोटी सहानुग्रह अनुदान दिले


     सांगोला प्रतिनिधी

            महाराष्ट्रातील २०२४ या वर्षात जिल्हा परिषद सेवेतून निवृत्त झालेल्या शिक्षकांचे पेन्शन विक्री व उपदानाचे  रक्कम येत्या ५ सप्टेंबर शिक्षक दिना पर्यंत देण्यात येईल असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक मा शरद गोसावी सो यांनी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पदाधीकार्यानां आश्वासन दिले

             महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालक  पदावर असताना मा शरद गोसावी सो यांनी राज्यातील कोवीड ड्यूटी करता मृत्यू पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना सुमारे ३० कोटी रक्कम सहानुग्रह अनुदान वाटप केल्या बद्दल व प्राथमिक शिक्षण संचालक पदावर राज्य शासनाने कायमस्वरूपी बदली केल्याने *महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले* या वेळी राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले, नेते विजयकुमार बहाकार, राजाराम वर्षे , जयंत घाट, प्रदीप घाडगे,  शंकरराव सावंत ंवंसतराव दिघे ंसिध्देश्वर झाडबूके, दिनकरराव घोडके, बादशहा मुल्ला, सुभाष फुलारी, काळ्या सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते

          राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी उपदान आणि पेन्शन विक्री साठी अंदाजे ९५० कोटी रक्कम लागणार आहे साधारण सप्टेंबर २४ ते आजतागायत सेवानिवृत्त शिक्षकाचें रक्कम थकीत असल्याचे निदर्शनास आणून दिले, संगणक कपातीचे रक्कम जिल्हा परिषद स्तरावरून देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला सूचना द्यावी आणि राज्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अनुदान निर्धारन करून सेवानिवृत्ताना घरवापसी प्रवास भत्ता देण्यास सांगावेत अशी मागणी केले

         महाराष्ट्र सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे कार्यकारी मंडळाची सभा पुण्यातील शिक्षक भवनात पार पाडली या सभेत सेवानिवृत्तीचे निवड श्रेणी, अपात्र शिक्षकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, पेन्शन अंशराशीकरन समायोजनेची मर्यादा १२ वर्षे, पूर्वलक्षी प्रभावी पदवीधर शिक्षकांना मुख्याध्यापक पदौन्नतीत मानीव वेतनवाढीचा लाभ आदी विषयांवर चर्चा झाली सभेस अकोला, पालघर, सिंधुदुर्ग, नांदेड ंअलीबाग, सोलापूर लातूर अहिल्यानगरी, अहमदनगर जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्रतिनिधी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत