महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष पदावर शिवानंद भरले सोलापूर तर सरचिटणीस पदावर रामराव वराड- हिंगोली यांची फेर निवड
सांगोला प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य जिप नप मनपा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा पुणे येथील शासकीय शिक्षक भवनात २८ जुलैला संपन्न होवून अध्यक्ष पदावर सोलापूरचे शिवानंद भरले तर सरचिटणीस पदावर हिंगोलीचे रामराव वराड यांची बहुमताने फेर निवड झाली आहे
महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले सुमारे १ लाख ५००० सेवानिवृत्त आहेत त्या पैकी ९५℅ सेवानिवृत्त शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील असून महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे ७०℅ सभासद आहेत
पुर्वीच्या कार्यकारी मंडळाची तीन वर्षे मुदत संपल्याने राज्य सेवानिवृत्त शिक्षकाचे नेते मा राजाराम वरूटे कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली अकोले जिल्ह्यातील जेष्ठ नेते मा विजयकुमार बहाकार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील शासकीय शिक्षक भवनात पार पाडली या सभेत आगामी तीन वर्षासाठी पदाधिकारी निवडले
अध्यक्ष भरले व सरचिटणीस वराड यांच्या काळात राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकासाठी ११०० कोटी पेन्शन विक्री रक्कम व उपदान मिळवून दिले १५० कोटी सेवानिवृत्ताना वैद्यकीय बीले मिळवून दिले, कोवीड ड्यूटी करता मृत्यू पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना २७ कोटी सहानुग्रह अनुदान मिळवून दिले त्यांच्या कार्याचा झपाटा पाहून राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक सभासद पर्ननिवड त्यांचीच केली आहे या सभेला राज्यातील ३० जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत