लिंग धारण हे जीवनाचे मोठे ध्येय आहे.. डॉक्टर धारेश्वर महास्वामीजी
नाझरे प्रतिनिधी
सकाळी उठल्याबरोबर स्नान विधी आटपून सर्वांनी लिंग पूजा करणे गरजेचे आहे कारण आत्मलिंग म्हणून आम्ही पूजा करतो व लिंगाचे एवढे महत्त्व आहे की पंढरीच्या पांडुरंगावर सुद्धा लिंग आहे व त्यामुळे लिंग धारण हेच जीवनात मोठे ध्येय आहे हे समजून वीरशैव बांधवांनी वाटचाल करावी.
लिंगावर निष्ठा ठेवा व लिंग पूजा कधीही सोडू नका शेवटी व सुरुवातीस शिव महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याचे नामस्मरण करा म्हणजे शरीरावर चांगले परिणाम होतील व यासाठी गुरुने दिलेला मंत्र हा सर्वश्रेष्ठ आहे हे समजून ओम नमः शिवाय म्हणा जीवनात काहीही कमी पडणार नाही व यासाठी सर्वांनी धर्माचे पालन करा, चुकीच्या मार्गाने जाऊ नका व मुला मुलीवर चांगले संस्कार करा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळे घेऊन हर हर महादेव घोषणा देऊन स्वराज्य निर्माण केले व फार पूर्वीपासून शिवपूजा ही केली जात आहे तसेच महात्मा बसवेश्वर आणि लिंगायत धर्माचा प्रचार प्रसार केला व महात्मा बसवेश्वर हे सामान्य नव्हते ते ज्ञानी होते व त्यामुळे भक्ती हीच सर्वात मोठी शक्ती आहे हे दिसून येते. यासाठी सर्वांनी शिव पूजा करून जीवनाचे सार्थक करावे व तशी बुद्धी कुलदैवत वीरभद्र तुम्हा सर्वांना देवो हीच प्रार्थना, व गुरु, लिंग व जंगमाची सेवा करा असेही धारेश्वर महास्वामिजी वीरभद्र मंदिर नाझरे येथे आशीर्वाचनात सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत