Breaking News

मोराळे येथील श्री दत्त मंदिरास व अन्नदानास मदत करा.. गुरुवर्य भालचंद्र पाटील काका..! आटपाडी येथे प्रबोधन संपन्न


 

सांगोला प्रतिनिधी 

       मानवी जीवनात खरंच सुख, समाधान पाहिजे असेल तर मांसाहार व मद्यपान सोडा तसेच आंधळी भक्ती न करता अंतकरणापासून निष्ठा ठेवून देवाची भक्ती करा व भोग संपायचा असेल तर मोराळला येऊन श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणजे दत्त महाराज यांची सेवा करा व मंदिरास तसेच अन्नदानास मदत करा असे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी जवळे मल्टीपर्पज हॉल आटपाडी येथे प्रबोधनात सांगितले. 

     मनातील अहंकार दूर करून सकाळ, संध्याकाळ एक तास नित्य नियमाने परमेश्वराची सेवा करा व यासाठी भगवंताने मनुष्य जन्म दिला आहे तर आत्महत्या अगर मनात वाईट विचार न आणता दत्त महाराजांची भक्ती करा व ग्रंथाशिवाय ज्ञान मिळत नाही यासाठी गुरुचरित्राचा अभ्यास करा व त्यामुळे सामान्य माणूस राजा कसा होतो हे यातून समजेल. दर गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री सव्वा बारा वाजेपर्यंत श्री दत्त महाराज मोराळ येथे असतात त्याची प्रचिती सर्वांना आली आहे व देव भाव बघतात धर्म बघत नाहीत त्यामुळे श्री गुरुदत्त महाराजांची सेवा अगर भक्ती कोणालाही करता येते. तसेच शिवदत्त च्या आरती चा महिमा कसा आहे याचा प्रत्यय सर्व भक्त जणांना दिसून आला. 

   नामस्मरण करताना देवासमोर आपण आहोत हा भाव ठेवून करा व माणसाने एक पाऊल पुढे टाकले तर श्री दत्त महाराज चार पाऊल पुढे टाकतात व भक्तांना मदत करतात तसेच मोराळला भव्य दिव्य असे दत्त महाराजांचे मंदिर बांधकामासाठी आपण कोणताही फंड घेत नाही व हे मंदिर सात्विक भक्ताच्या मदतीने उभारेल परंतु यासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे. अंधश्रद्धेतून श्रद्धे कडे येणारे मोराळे क्षेत्र आहे. श्री दत्तगुरूंनी आपणास व संतोषला अनुग्रह दिला व आपण सर्वत्र प्रबोधनाचे काम विनामूल्य करीत असून, कोठेही सांगा आपण प्रबोधन करू व मुक्ती पाहिजे असेल तर मोराळला भेट द्या असे ही गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी यावेळी प्रबोधनात सांगितले. यावेळी आटपाडी व दिघंची येथील सेवेकरी यांनी गुरुवर्य भालचंद्र काका यांचा सत्कार केला, तसेच सौ मयुरी प्रसाद जवळे यांचा सत्कार गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांच्या हस्ते करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत