Breaking News

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेगाव बुद्रुकचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

सांगोला प्रतिनिधी 

       महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी 2025 च्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेगाव बुद्रुक ता. सांगोला या शाळेने घवघवीत यश मिळवले असून, तीन विद्यार्थिनीने यशाची परंपरा कायम राखून शाळेचे नाव उज्वल केले आहे. 

सदर परीक्षेत इयत्ता            पाचवीतील कुमारी आराध्या प्रदीप ढेंबरे, कुमारी कोमल मारुती पाटील व कुमारी अमृता दत्तात्रेय यादव या तीन विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत आलेल्या असून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा त्यांनी रोवला गेला आहे. सदर विद्यार्थिनींना शिक्षिका सौ मंगल दिनकर घोडके यांचे मार्गदर्शन लाभले असून, मुलीच्या पालकांनी शिक्षिका मंगल घोडके यांचा सत्कार केला आहे. 


 शाळेचे मुख्याध्यापक मधुकर भंडारे, शिक्षक पंकज कांबळे, सौ वैशाली वाघ, सौ अलका तावरे इ. शिक्षकांनीही मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र आबा घोडके यांनी गुणवत्ताधारक विद्यार्थिनी व वर्गशिक्षिका सौ मंगल घोडके यांचा विशेष सत्कार केला. सदर यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत