अनुभव मंटपात महात्मा बसवेश्वर यांच्या विचाराची प्रचिती.. रविराज शेटे यांचा सत्कार संपन्न
सांगोला प्रतिनिधी
जागतिक लिंगायत महासभेच्या वतीने रेवणसिद्धेश्वर मंदिर मंगळवेढा येथे 14 वा मासिक अनुभव मंटप श्रद्धा, समर्पण आणि विचार प्रवर्तनाच्या वातावरणात संपन्न झाला. महात्मा बसवेश्वर हे 12 व्या शतकातील महान तत्त्वज्ञ, समाज सुधारक व कवी होते तसेच त्यांनी जातीभेद, कर्मकांड, अंधश्रद्धा व अन्याय विरुद्ध ठाम भूमिका घेतली आज त्यांच्या विचारांची गरज आहे.
यावेळी जागतिक लिंगायत महासभेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रविराज शेटे यांची निवड झाल्याने त्यांचा डॉक्टर भीमाशंकर शिंदगी, शरण रविराज बिराजदार व शरण अमोल म्हमाणे यांच्या शुभहस्ते व बसवेश्वर पाटणे, श्रीकांत खडके, विवेक घोंगडे, बजरंग राजमाने, नागेश कस्तुरे, मा. मुख्याध्यापक दयानंद भोरे, प्रणव राज शेटे, रुद्र पाटणे, विलास लंगोटे, संतोष गोवे, प्रकाश मदगुल, बापूसाहेब अवघडे, श्री गोडसे इ. उपस्थित होते. तसेच पंधरावा अनुभव मंटप रविवारी 10 ऑगस्ट रोजी रेवणसिद्धेश्वर मंदिर मंगळवेढा येथे सकाळी 11 वाजता होईल असे शरण रविराज बिराजदार व अमोल म्हमाणे यांनी सांगितले. शेवटी सर्वांचे आभार बसवेश्वर पाटणे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत