राज्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघटनेची २८ जुलैला पुण्यात बैठक
सांगोला प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सोमवार दिनांक २८ जुलैला सकाळी ११ वाजता पुणे येथील शिक्षक भवनात बैठक बोलावली असल्याचे पत्रक महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी प्रसिध्दीस दिली आहे
राज्यातील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रातील २०२४ व २५ सालात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या ग्रॅज्यूटी, पेन्शन विक्रीसाठी रक्कम मिळावेत सेवानिवृत्तानां निवडश्रेणीचा व १०-२०-३० अश्वासीत प्रगती योजनेचा लाभ घ्यावा, निवृत्तीनंतर घरवापसी प्रवास भत्ता मिळावेत, पेन्शन विक्री समायोजन केद्र सरकार प्रमाणे ११ वर्षांनी समायोजन करावेत जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षकाचें पेन्शन दरमहा कोषागार कार्यालयामार्फत व्हावेत या मागणीसाठी चर्चा होणार आहे बैठकी नंतर शिक्षण संचालक मा शरद गोसावी यांना प्राथमिक शिक्षण संचालक पदाचा कायम चार्ज मिळाले बद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे
सदरच्या बैठकीला सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित राहावेत असे आवाहन सरचिटणीस रामराव वराड- हिगोली यांनी आवाहन केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत