Breaking News

शक्तिपीठ रद्द साठी नेतेमंडळींनी नेतृत्व हाती घ्यावे.. - अध्यक्ष ऍड सचिन देशमुख


 सांगोला प्रतिनिधी 

       शक्तिपीठ रद्द होण्यासाठी व गावासाठी व जमिनीसाठी सर्व शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून मोजणी थांबवावी व शक्तीपीठ रद्द करावा तसेच शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांनी आजी व माजी नेतेमंडळींना मतदान केले आहे परंतु त्यांचे शक्तिपीठाकडे दुर्लक्ष होत आहे तरी शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील व भाजप जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी नेतृत्व हाती घ्यावे व बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी वाचून त्यांना न्याय द्यावा अशी एक मुखी मागणी शक्तीपीठ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सचिन देशमुख यांनी सांगोला तहसील कार्यालय समोर शेतकऱ्या पुढे बोलताना केली. 


   बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी मोजणी अगोदर त्यांची भूमिका प्रशासनाने समजावून घ्यावी व यासाठी प्रशासनाने बाळाचा वापर करू नये व जर केला तर शेतकरी संघर्ष करतील यासाठी एकच जिद्द शक्तिपीठ रद्द अशा हात उंचावून शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या व गरज नसलेला शक्तिपीठ रद्द करा, जमीन आमच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिल्या. उपविभागीय अधिकारी भूसंपादन अधिकारी मंगळवेढा यांनी सांगोला तालुक्यातील बाधित शेतकऱीउजनी हरकती घेतल्या अशा सर्व शेतकऱ्यांना सांगोला तहसील कार्यालय येथे हजर राहून खुलासा करण्याचे आवाहन केले होते व त्याप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुनावणीसाठी सकाळी दहा वाजल्यापासून तहसील कचेरी येथे गर्दी केली होती व आपले लेखी म्हणणे भूसंपादन अधिकारी यांना सादर केले व यामध्ये माझी जमीन गेल्यास उपजीविकेचे साधन राहणार नाही व मी कुटुंबाचे पालन पोषण कसे करणार व यासाठी शक्तीपीठ महामार्गास विरोध आहे व जमीन संपादित करू नये असा खुलासा सादर केला आहे. 


विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार अभिजीत पाटील व आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील यांनी यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाज उठवला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा असे सचिन देशमुख यांनी सांगितल्यावर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा जयजयकार केला.    

         संपादित जमिनीचा दर जाहीर करा व मान्य असेल तर शेतकऱ्यांची लेखी संमती घ्या व मगच भूसंपादन करा असे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सचिन देशमुख यांनी भूसंपादन अधिकारी यांना यावेळी सांगितले तसेच अजून काही शेतकऱ्यांचे खुलाशी राहिले आहेत ते घ्या असेही यावेळी सांगितले. यावेळी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच शेतकरी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रकाश सोळशे, सचिव ऍड शरद यादव, इ. उपस्थित होते. शेवटी शेतकरी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष दादासो वाघमोडे यांनी सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत