Breaking News

विधवा, अपंग, मागासवर्गीय वंचित महिलांना घरकुले द्या... -जयश्री सावंत


 सांगोला प्रतिनिधी 

         सांगोला तालुक्यातील विधवा, अपंग, मागासवर्गीय महिला घरकुल लाभापासून वंचित आहेत व त्यांना घर नसल्याने त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. तसेच त्यांना शेती अगर शासकीय नोकरी नाही अशा सर्व भूमिहीन सांगोला तालुक्यातील महिलांना गावठाण मध्ये जागा उपलब्ध करून देऊन त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्या असे केंद्रीय मानवाधिकार संघटन दिल्ली शाखेच्या वतीने जयश्री सावंत व महिलांनी सांगोला तहसीलदार यांना भेटून निवेदन सादर केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत