कोळे येथे रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांची जयघोषात मिरवणूक संपन्न..! महास्वामीच्या मठात शिवपाठ, पारायण, भजन, किर्तन, गुरु दीक्षा, रक्तदान, महाप्रसाद वाटप करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
नाझरे प्रतिनिधी
||गुरु म्हणजे भक्ती गुरु म्हणजे शक्ती ||गुरु म्हणजे प्रेमानंद गुरु तोचि सच्चिदानंद|| गुरुचे करा भजन गुरु करी दुःख निवारण|| गुरु माझा योगीराणा|| गुरु पायी श्रद्धा हीच खरी गुरुदक्षिणा ||
हेच विचार मनात घेऊन गुरुपौर्णिमेनिमित्त कोळे ता. सांगोला येथील महास्वामींच्या मठात लाखो भाविकांनी नतमस्तक होऊन गुरु शिष्य भेटीची ओढ काय असते याची प्रचिती गुरुपौर्णिमा दिवशी महास्वामीच्या मठात दिसून आली. व गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली, कोळेकर महास्वामी की जय, हर हर महादेव या जयघोषाने कोळेनगरी दुमदुमली व कोळेगावातून भव्य मिरवणूक काढून जयघोष करून गुरुप्रती वंदन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली तसेच महाराष्ट्र व कर्नाटक मधून हजारो भाविकांनी गुरुचरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या आशीर्वादाने व कोळेकर महास्वामीजी एकतीसावे पिठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला.
गुरु केवळ ग्रंथ शिकवणारा नसून योग्य मार्ग दाखवणारा आहे व कोळे येथील गुरुवादी चे महत्व आहे व प्रत्येकाने गुरुची सेवा करा म्हणजे यश प्राप्ती होईल असे कोळेकर महास्वामिनी आशीर्वाचनात सांगितले. तसेच यावेळी तनुजा कुदळे यांनी गुरू गादी चे महत्व सांगितले. यावेळी असंख्य सेवेकरी यांचा गुरु गादी तर्फे सत्कार करण्यात आला. मिरवणुकीत गजी ढोल, वीरभद्र पुरोहित यांची शस्त्रे टोचणे, शिवकालीन दांडपट्टा चालवणे व साहसी खेळाचे प्रात्यक्षिक, ओव्या, इत्यादी चे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले.
*शेकडो भक्तांचे रक्तदान*
गुरुपौर्णिमेनिमित्त रेवनील ब्लड बँक यांचे तर्फे 225 रक्तदात्यानी रक्तदान केल्याचे सोमेश यावलकर यांनी सांगितले.
*नेटके नियोजन*
गुरु पौर्णिमा उत्सव कमिटी व वीरशैव तरुण मंडळ व ग्रामस्थ कोळे यांनी नेटके नियोजन केले असे नागरिकात बोलले जात होते.
*लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ*
सकाळी दहा वाजले पासून ते रात्री अकरा पर्यंत अन्नछत्र मंडळात शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सूत्रसंचालन सुनील माळी यांनी केले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत