जीवन जगत असताना आनंददायी जीवन जगा... जगन्नाथ भगत...! पेन्शनर संघटनेतर्फे सत्कार संपन्न
सांगोला प्रतिनिधी
प्रत्येकाने जीवन जगत असताना ते आनंददायी जीवन जगा व यासाठी निगेटिव्ह विचार सोडा व सेवानिवृत्त झाल्यानंतर ही पेन्शनर संघटनेत अनेक जण धडाडीचे कामे करीत आहेत व याचा आम्हास अभिमान आहे व यासाठी प्रत्येक तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता यशस्वी उद्योजक व प्रेरणादायी चरित्र असलेले शरदचंद्र पवार साहेब यांचा आदर्श घ्या व येत्या 18 जुलै रोजी ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे सूर्योदय उद्योग परिवाराचे प्रमुख जगन्नाथ भगत यांनी पेन्शनर संघटना कार्यालय सांगोला येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे हे होते.
पेन्शनर संघटनेतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते व संघटनेत सामील व्हा असे आवाहन सल्लागार शंकर सावंत यांनी यावेळी केले.
सूर्योदय परिवाराचे पैसे कमविणे हे काम नसून गरजूंना काम देणे हे आहे असे पेन्शनर संघटनेचे सल्लागार सदाशिव साबळे गुरुजी यांनी यावेळी सांगितले तसेच उपाध्यक्ष जयवंतराव नागणे, संचालिका प्रतिभा शेंडे, लक्ष्मण सावंत, रविराज शेटे, भारत हाके, शंकर मासाळ इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. तर सेवानिवृत्त शिक्षक मनोहर राऊत, मुरलीधर इमडे, सिद्धेश्वर खुळे, दत्तात्रय गोडसे, भारत हाके, प्रदीप पाटील, दिलीप पाटील, दत्तात्रय शास्त्रे, शंकर मासाळ, रविराज शेटे, जगन्नाथ भगत, सदाशिव साबळे इ. चा सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी संघटनेचे सल्लागार सिद्धेश्वर झाडबुके, प्रभाकर कसबे, कोंडीबा वाघमारे, दिनकर घोडके, एकनाथ जावीर, अंबिका शिंदे, महादेव जाधव, राजेंद्र जंवजाळ, दादासो सोनलकर, कार्याध्यक्ष अरुण वाघमोडे, खजिनदार गंगाराम इमडे व शिक्षक वर्ग उपस्थित होता. शेवटी सहसचिव दत्तात्रय खामकर यांनी सर्वांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत