पायोनियर पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
पायोनियर पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अनिल येलपले सर, शाळेचे प्रिन्सिपल श्री. सतीश देवमारे सर, तसेच अकॅडेमी इनचार्ज मृणाल राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी आपल्या भावना व्यक्त करत भाषणे सादर केली, आणि प्रत्येक शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर करून गुरूंप्रती आपली आदरांजली अर्पण केली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित सर्वांची मने जिंकली.
प्रमुख पाहुणे आदरणीय अनिल येलपले सर यांनी विद्यार्थ्यांना "विद्यार्थी चांगला श्रोता असावा" या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रिन्सिपल सतीश देवमारे सर यांनी विद्यार्थ्यांना गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कसे असावे याचे प्रभावी मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून, शाळेतील समर्पित शिक्षक तनुजा ढगे, रूपाली गायकवाड, प्रतीक्षा येलपले सारिका सावंत व पूजा लिंगायत यांचा वर्षभराच्या मेहनतीबद्दल विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आश्विनी जाधव मॅडम यांनी सुरेखपणे पार पाडले, तर आभारप्रदर्शन पूजा लिंगायत मॅडम यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमात गुरूंच्या कार्याबद्दल आदर, कृतज्ञता आणि संस्कार यांचा संगम पाहायला मिळाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत