अजनाळे गावासाठी “एस के एंटरप्रायजेस” उत्तम सेवा देईल – तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव
अजनाळे सचिन धांडोरे:
अजनाळे गावामध्ये “एस के एंटरप्रायजेस” या नव्याने सुरू झालेल्या कृषी केंद्राचे उद्घाटन नुकतेच पार पडले. या केंद्रामुळे गावातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या कृषी सेवांचा लाभ अधिक सोप्या व सुटसुटीत पद्धतीने मिळणार आहे. गावात डाळिंबाचे क्षेत्र पुन्हा दुपटीने वाढत आहे, त्यामुळे कृषी केंद्राची गरज भासत होती. एस के एंटरप्रायजेस हे केंद्र शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्तम सेवा देईल आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे असे मत तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
काल शुक्रवार दिनांक १८ जुलै रोजी अजनाळे येथे प्रकाश येलपले व उत्तम लोकरे यांनी नव्याने सुरू केलेल्या एस. के .एंटरप्राइजेस या कृषी सेवा दुकानाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी
पोलीस उपनिरीक्षक कांबळे, काशिद, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले, माजी जिल्हा परिषद सदस्य संगम धांडोरे, पंचायत समिती माजी सभापती राणीताई कोळवले, गटशिक्षणाधिकारी मयूर लाडे, चेअरमन हमुनाना येलपले, माणदेश एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद (दादा) येलपले, शामराव येलपले, उपसरपंच बापू कोळवले, भालचंद्र चौगुले, चंद्रकांत चौगुले ,पो कॉ. विठ्ठल विभुते,यांच्यासह अन्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना दिपाली जाधव म्हणाल्या की ,पि.एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता सोमवारपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांना हप्ता मिळणार नाही. खाते बंद झाले तर ते पुन्हा सुरू होण्यासाठी ६ ते ७ महिने कालावधी लागतो, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी वेळेत फार्मर आयडी काढणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावे असे आवहान यावेळी जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हणमंतराव कोळवले यांनी केले तर आभार प्रदर्शन राजाराम पाटील यांनी मानले या कार्यक्रमाला शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत