महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया जत तालुका पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
जत : महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेची बैठक जत येथे संपन्न झाली. प्रदेशाध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शानाखाली नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार,जिल्हा कार्यकारिणीवर ज्येष्ठ पत्रकार नजीर चट्टरगी यांच्या निवडीची घोषणा राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी केली.यावेळी पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले.
यानंतर बैठकीत संघटनेच्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पत्रकारांसमोरील आव्हाने, स्थानिक प्रश्नांवरील माध्यमांची भूमिका, तसेच एकसंधपणे कार्य करण्यासाठी संघटनेच्या पुढील योजनेबाबत चर्चा झाली.या बैठकीदरम्यान नूतन जिल्हाध्यक्ष मनोहर पवार व नूतन तालुकाध्यक्ष प्रकाश करगणिकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे नियुक्ती पत्रे देण्यात आली. राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी नविन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पत्रकारितेतील जबाबदारीबाबत मार्गदर्शन केले.
संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत निष्पक्ष व निर्भीड पत्रकारिता करण्याचा निर्धार करण्यात आला.संघटनेच्या जत तालुका उपाध्यक्ष पदी तानाजी कदम,अजित सनदी तर खजिनदारपदी भागवत काटकर,संपर्क प्रमुख संजय कोटगोंड,विठ्ठल हेगडे,सचिव प्रमोद मेटकरी ,सहसचिव महमंद शेख, आदींच्या निवडी झाल्या.यावेळी पत्रकार अमोल कुलकर्णी, विश्वनाथ तळसंगी,के.अजितकुमार,गोविंद निकम,संतोष गुनकी, प्रभाकर गायकवाड यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते मोहन मानेपाटील, डॉ. शफिक इनामदार, बंडू शेख आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रकाश करगणिकर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत