Breaking News

जागतिक लिंगायत महासभेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रविराज शेटे यांची निवड...


 सांगोला प्रतिनिधी 
         लिंगायत धर्मातील सर्व पोट जातींना एकजूट करून समाज संघटना वाढविणे तसेच महात्मा बसवेश्वराचे तत्व व प्रचार प्रसार करण्यासाठी जागतिक लिंगायत महासभेच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी रविराज शेटे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शरण परमानंद जी अलगोंड पाटील हे होते. 
     जागतिक लिंगायत महासभेतर्फे मातोश्री सिद्धवा बाई हत्तुरे सांस्कृतिक भवन सोलापूर येथे बसव प्रतिभा पुरस्कार प्रदान सोहळ्यात महासभेचे अध्यक्ष शिवानंद गोगाव, कोरणे श्वर महास्वामीजी, बसवलिंगेश्वर महास्वामीजी, एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव जी कोगनुरे, युवा नेते अमरजी पाटील, कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, महाप्रभारी प्रभुलिंग महागावकर, राज्याध्यक्ष राजशेखर तंबाके, माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, प्रधान सचिव आर जी शटगार, प्रार्थमिक शिक्षक संघाचे विरभद्र यादवाड, रेवणसिद्ध बीजर्गी, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र हिंगमिरे, लायन्स क्लबचे राजशेखर कापसे, ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशिनाथ भत गुणकी, मार्केट कमिटी संचालिका सौ. इंदुमती अलगोंड पाटील, प्राचार्य गुरुलिंग धबाले, दानया कवटमीमठ,इ. शुभ हस्ते सन्मानपत्र, शाल, पुष्पहार, बसव प्रतिमा देऊन रविराज शेटे यांची निवड करून सत्कार करण्यात आला. 
     सदर प्रसंगी लिंगायत महासभेचे पदाधिकारी विजयकुमार भावे, सौ. राजश्री थंळगे, लक्ष्मण चल गिरी, राजेंद्र खसकी, नागेंद्र कोगनुरे, शिवराज कोटगी, चन बसप्पा गुरु भेटी, राजेंद्र हौदे, बसवराज नंदर्गी,, कल्याणी पाकणी, शेखर बाबुराव पाटील, शिवशरण गोविंदे अमोल म्हमाणे धोंडप्पा तोरंगी, शिवानंद बैहिरमठ, मृत्युंजय कल्याणी नामदेव फुलारी, विश्वजीत हेले, डॉक्टर भीमाशंकर सिद्धगी, शरण बसवेश्वर पाटणे, राजकुमार रायचूरे, रमेश भाऊ शिरदाळे, आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके, अरविंद डोंबे, महेश वाघमारे, महासभेचे सर्व कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत