सेवानिवृत्त शिक्षकाच्यां कामासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी चेबंरसमोर धरणे आंदोलन
सांगोला प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागांकडून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाच्यां उपदानातून कपात केलेली रक्कम परत करण्यासाठी प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने जिल्ह्यातील २०० सेवानिवृत्त शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी चेबंरसमोर थरणे आंदोलन केले
मुबंई उच्च न्यायालयात या विरोधात रिटपीटीशन दाखल केले होते त्याचा निर्णय सेवानिवृत्ताच्यां बाजूनें लागून कपात केलेली रक्कम परत करण्यासाठी न्यायालयाने आदेश देऊनही जिल्हा परिषद टाळाटाळ करीत आहे आणि दर महा पेन्शन विलंबाने करीत आहे
रक्कम मिळावे व पेन्शन १ तारखेला मिळावेत या मागणीसाठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले याच्यां नेतृत्व खाली मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना भेटण्यासाठी चिठ्ठी दिली असताना भेट टाळले हजर असलेल्या २०० वयस्कर सेवानिवृत्त शिक्षक ठिय्या आंदोलन केले यावेळी सुभाष फुलारी सिध्देश्वर धसाडे रामचंद्र बिराजदार वंसत दिघे, शंकर सावंत, सिध्देश्वर झाडबुके, श्रीशैल मठपती, पंचप्पा सावळ, महबुबी दंडवते,दिनकर घोडके व सर्व शिक्षक बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत