Breaking News

जत्तीवस्ती संख जि प शाळेमध्ये शैक्षणिक नवीन वर्ष उत्साहात प्रारंभ: नवगतांचे धुमधडाक्यात स्वागत


 सांगोला प्रतिनिधी 

            शैक्षणिक वर्ष 25- 26 चा शुभारंभ दिनांक 16 जून पासून सर्व राज्यभर झाला याच पार्श्वभूमीवर जि प प्राथमिक मराठी शाळा जत्तीवस्ती संख येथेही नवीन शैक्षणिक वर्ष उत्साही स्वरूपात सुरुवात करण्यात आली यासाठी नवगतांचे स्वागत पुस्तक वाटप गणवेश वाटप व अन्य विविध उपक्रमांनी हा दिवस अगदी खास पद्धतीने एखादा सण असल्याप्रमाणे साजरा करून जत्तीवस्ती संख शाळेत शुभारंभ करण्यात आला.


यावेळी पहिली मध्ये नव्याने दाखल झालेल्या बालचंमूचे स्वागत व सत्कार ही अगदी धुमधडाक्यात करण्यात आला यावेळी दाखल मुलांना शैक्षणिक साहित्य पुस्तके व फुलांच्या वर्षावात त्यांचा वर्गामध्ये प्रवेश घेण्यात आला. या उत्साही वातावरणामध्ये मुलांबरोबर पालखी अगदी रंगून गेले होते. 

        जत्तीवस्ती संख शाळेत नेहमीच नानाविध उपक्रम राबवून मुलांना नवनवीन शिक्षण दिले जाते तसेच त्या पद्धतीने 16 जून रोजी सुरू होणारे शैक्षणिक वर्ष देखील अगदी उत्साही वातावरणात व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून साजरा करण्यात आले यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक प्रणवराज शेटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब जत्ती, आप्पासाहेब जत्ती, अण्णासाहेब जत्ती, संतोष जत्ती, दत्ता जाधव, अंगणवाडी सेविका कांबळे मॅडम, मदतनीस रेखा जाधव तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर दिवस अतिशय उत्साही वातावरणात व आनंदमय मनोरंजनात्मक खेळ व गप्पागोष्टींतून शिक्षणाकडे या प्रवासातून अतिशय उत्साही ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत