Breaking News

नाझरे ग्रामपंचायत मध्ये मुख्याध्यापक अशोक पाटील यांचा सत्कार संपन्न...


 नाझरे प्रतिनिधी 

        नाझरे ता. सांगोला येथील शिक्षक नेते अशोक पाटील यांची जि.प. प्रा. शाळा घेरडी ता. सांगोला येथे पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाल्याने नाजरे ग्रामपंचायत मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. 

       शाळेबरोबर इतर कामात हे सर्वांना वेळ देऊन चांगले काम व चांगले नेटवर्क अशोक गुरुजींचे आहे असे मत मा. उपसभापती सुनील चौगुले यांनी यावेळी सांगितले. तर विविध क्षेत्रात प्रावीण मिळवलेल्या व्यक्तीचा, युवकाचा सत्कार करण्याचा संकल्प अशोक गुरुजींचा आहे व तो संकल्प आज त्यांचा सत्कार करून पूर्ण होत आहे असे सोसा. चेअरमन सुनील बनसोडे यांनी यावेळी मत व्यक्त केले. विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या युवकांचा तसेच इतरांचा सत्कार करून प्रोत्साहन देण्याचे काम अशोक गुरुजींनी केले असे प्रा. विजय गोडसे यांनी सांगितले. तर आपणास यापूर्वी पंचायत समिती येथे आबासाहेबांमुळे गट सन्मवयक पद मिळाले व त्या न्याय दिला तसाच न्याय आपण मुख्याध्यापक पदास देऊ असे सत्कारमूर्ती अशोक पाटील यांनी सांगितले. 

      सदर प्रसंगी मा. सरपंच शामराव आप्पा वाघमारे, उत्तम पाटील, डॉ. विजय सरगर, मा. प्राचार्य टी. के. वाघमारे, गोरख भाऊ आदाटे, ग्राम. सदस्य शशिकांत पाटील, युवा नेते चंद्रकांत बंडगर, सुभाष कोकरे, सचिन कोकरे, आनंदा कोकरे, रामचंद्र कोकरे, राजाभाऊ बंडगर, बाळासो वाघमारे, पांडुरंग वाघमारे, रामचंद्र लिंगे, मारुती सरगर, सुनील अडसूळ, मदन रायचुरे, लक्ष्मण ढोबळे, राजू गड हिरे, मा. उपसरपंच मधुकर आलदर, शिक्षक नेते दिलीप वाघमारे, बापू पाटील, शिवाजी अडसूळ, गोरख बनसोडे, गंगाधर जोंधळे, सोसा. उप चेअरमन राजाभाऊ कोळेकर, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शिवभूषण ढोबळे तर आभार युवा नेते संजय सरगर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत