जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.
नाझरे प्रतिनिधी:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथे नवागातांचे उत्साहात स्वागत - परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सरपंच श्री प्रसाद उर्फ बाळासाहेब शिंदे यांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चला शाळेत जाऊया या उपक्रमांतर्गत नवागतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री मनोहर पवार सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून चला शाळेत जाऊया कार्यक्रमाची माहिती देऊन नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री बाळासो खुळपे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री चांगदेव शिंदे, शिवछत्रपती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री सर्जेराव मोहिते . बलवडी गावचे पोलीस पाटील श्रीकांत तोरणे, शाळा व्यवस्थापन समिती मा. अध्यक्ष श्री विकास पवार , मा. मुख्याध्यापक श्री शिवाजी शिंदे गुरुजी ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री शिवाजी शिंदे, सदस्य श्री बालीश सरोदे व्यवस्थापन समिती सदस्या सौ. कोमल कवडे, श्री हनुमंत शिंदे, श्री बाबुराव पवार, श्री वैभव गुरव, श्री पिंटू गुरव,श्री आप्पासो शिंदे,श्री विनायक काळे शाळेतील शिक्षक श्री गोरखनाथ बनसोडे सर, श्री सागर गुरव सर, श्री विजयकुमार शिंदे सर, श्रीमती योगिता शांत मॅडम, श्रीमती स्वाती पाटील मॅडम, श्रीमती सोनल सावंत मॅडम, अंगणवाडी सेविका श्रीमती पारूबाई धायगुडे मॅडम, अंगणवाडी मदतनीस श्रीमती सुवर्णा खुळपे मॅडम गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी उपस्थित होते. मा. सरपंच श्री प्रसाद शिंदे यांनी जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व सांगून माझी मुलगी डॉ. शितल सुद्धा याच शाळेत शिकून एमबीबीएस एमडी झाली याचा मला सार्थ अभिमान आहे असे उद्गार काढले व ग्रामस्थांनी आपली मुले जिल्हा परिषद शाळेतच घालण्याचे आवाहन केले. तसेच स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास एक हजार रुपये असे बक्षीस जाहीर केले. इयत्ता पहिलीतील सर्व मुलांचे गुलाब पुष्प पाठ्यपुस्तके गणवेश बूट व सॉक्स जोडी देऊन स्वागत केले. शाळेतील पहिलीच्या नवीन दाखल विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर मधून सर्व गावातून वाजत गाजत फेरी काढण्यात आली. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना गोड शिरा भात जेवण देण्यात आले.तसेच शिवछत्रपती कला क्रीडा संस्कृतीक मंडळ बलवडी यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट पुढे वाटप करण्यात आले. प्रभात फेरी कार्यक्रमासाठी बलवडी गावातील प्रगतशील बागायतदार श्री आगतराव शिंदे महाराज यांनी ट्रॅक्टर देऊन सहकार्य केल्याबद्दल मा. सरपंच श्री प्रसाद शिंदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांचेही स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्वांचे श्री विजयकुमार शिंदे सर यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत