जागतिक लिंगायत महासभेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रविराज शेटे यांची निवड झाल्याबद्दल दैनिक सांगोला नगरी परिवाराच्या वतीने सत्कार संपन्न
सांगोला/ प्रतिनिधी:
जागतिक लिंगायत महासभेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रविराज शेटे सर यांची निवड झाल्याबद्दल दैनिक सांगोला नगरी परिवाराच्या वतीने कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदतकक्ष पंढरपूर विभाग प्रमुख सतीश सावंत , पत्रकार दशरथ बाबर, पत्रकार समाधान धांडोरे, पत्रकार सचिन धांडोरे ,पत्रकार करण मोरे, तसेच दीपक गाडे ,रुद्र पाटणे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी रविराज शेटे यांच्या संघटनेच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. पत्रकार करण मोरे यांनी उपस्थितांच स्वागत केले तर पत्रकार विनोद चंदनशिवे यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत