Breaking News

साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त गुणवंतांचा सन्मान सोहळा नाझरे येथे संपन्न....


नाझरे प्रतिनिधी 

        पांडुरंग सदाशिव तथा साने गुरुजी यांच्या 75 रव्या मूर्ती दिनानिमित्त विठ्ठल मंदिर नाझरे ता. सांगोला येथे विविध परीक्षांमध्ये उज्वल यश मिळवणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मिसाळ हे होते. 

यावेळी अभियंता असीम काझी, महसूल सहाय्यक अमित भोसले, डॉ. अनिकेत मिसाळ, डॉ. ऋतुजा गोडसे, डॉ. गौरी पाटील, दहावी हिंदी विषयात राज्यात प्रथम कुमारी ऋतुजा चव्हाण, श्रीधर कन्या प्रशाला प्रथम अवधूत जाधव, नेट परीक्षा उत्तीर्ण कुमारी गौरी गोडसे, सी ए टी परीक्षा उत्तीर्ण अतुल खंडागळे तसेच शिवम चौगुले इत्यादी विद्यार्थ्यांचा याबरोबर जागतिक लिंगायत महासभेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रविराज शेटे यांची तर हिंदी विषय शिक्षक प्रा. महेश विभुते यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सुरुवातीस प्रास्ताविक आदर्श मा. मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके यांनी केले तर सत्कारमूर्ती डॉ. ऋतुजा गोडसे व डॉ. गौरी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

     सदर प्रसंगी प्रा. नारायण पाटील, प्रा. वसंत गोडसे, सौ कमल झाडबुके, मा. केंद्रप्रमुख राजू काजी, मच्छिंद्र भोसले, के. आर. वाघमारे, शिक्षक माणिक मिसाळ, विजय शिंदे, रमेश चौगुले, हनुमंत खंडागळे, चव्हाण पेंटर, दत्तात्रय देशपांडे, नारायण गाडेकर, शिवाजी अडसूळ, इ. उपस्थित होते. सूत्रसंचालन मा. प्राचार्य प्रकाश परिचारक यांनी तर आभार रविराज शेटे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत