वझरे ग्रामपंचायत मध्ये श्रीमती शिंदे, श्रीमती मोरे, श्रीमती हिप्परकर, वाघमोडे, शेटे यांचा सत्कार संपन्न...
नाझरे प्रतिनिधी
वझरे ता. सांगोला ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेविका श्रीमती शिंदे मॅडम, तलाठी मोरे मॅडम यांची बदली झाल्याने त्यांचा सत्कार तर नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेविका श्रीमती हिप्परकर मॅडम, तलाठी वाघमोडे, व जागतिक लिंगायत महासभेच्या तालुका अध्यक्षपदी रविराज शेटे यांची निवड याबद्दल सर्वांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती शिंदे मॅडम, मोरे मॅडम, हिप्परकर मॅडम, तलाठी वाघमोडे व रविराज शेटे यांनी सत्कार केल्याबद्दल मनोगत व्यक्त केले. तर यावेळी माजी सरपंच अंकुश पाटील, मा. प्राचार्य के वाय पाटील, मा. ग्राम. सदस्य वसंत पाटील, युवा नेते महेश वाघमारे तसेच शिक्षिका लता पाटील यांनी सत्कार मूर्तीच्या कार्याची ओळख व आढावा सांगितला.
सदर प्रसंगी उपसरपंच लक्ष्मण वाघमारे, मा. सरपंच सोनाबाई पाटील, मा. सरपंच सौ. अंजली यादव, सरपंच सौ. बानू बाई मल्हारी चव्हाण, समाधान शेठ यादव, सचिन यादव, सौ. सुमन शिंदे, युवा नेते आनंदा कोकरे, रामचंद्र चोरमुले, मा. उपसरपंच बाबुराव जाधव, बाबासो कारंडे, सदाशिव वाघमोडे, राजू कोटी, श्रीमती लता महामुनी, राजू कोटी, प्रकाश पाटील, विलास चव्हाण, सचिन धोकटे, ग्राम. सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबा पवार यांनी तर आभार महेश वाघमारे यांनी मानले. यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.मल्हारी चव्हाण, तसेच समाधान शेठ यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत