Breaking News

१३ जून २०२५

समर्थ सद् गुरू संजीवा स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन....


नाझरे प्रतिनिधी 

         श्रीधर दत्तानंद जुनाट मंदिराचे जिर्णोधारक निष्का मी सेवाधीपती बाळ ब्रम्हचारी योगी समर्थ सद्गुरु संजीवा स्वामी महाराज यांच्या 43 व्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त मंदिर नाझरे.. वझरे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 15 जून पासून सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी पाच ते सात हरिपाठ व रात्री सात ते नऊ किर्तन सेवा होईल. 

      रविवार दि. 15 जून रोजी ह भ प माऊली टेंभुकर महाराज यांचे रात्री सात ते नऊ कीर्तन व नाझरे येथील जागर, दि. 16जुन रोजी ह भ प आशिष वलेकर बाल कीर्तनकार उदनवाडी यांचे कीर्तन तर बलवडी येथील जागर, दि. 17 जून रोजी ह भ प आप्पा चव्हाण महाराज यांचे कीर्तन तर चिनके येथील जागर, दि. 18 जून रोजी ह भ प भीमराव आडसूळ महाराज नाजरे यांचे कीर्तन तर अहिल्यानगर येथील जागर, दि. 19 जून रोजी ह भ प रामहरी खंडागळे महाराज कोळे यांचे कीर्तन तर बुद्धेहाळ येथील जागर, दि. 20 जून रोजी ह भ प उद्धव महाराज कोळे यांचे कीर्तन तर बंडगर वस्ती येथील जागर, दि. 21 जून रोजी ह भ प सद्गुरु संजीव दास महाराज यांचे शिष्य हभप सुखदेव आदाटे महाराज यांचे सकाळी दहा ते बारा किर्तन व पुष्पवृष्टी होईल, त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल.


शनिवार दि. 21 जून रोजी दुपारी चार वाजता समर्थ सद्गुरु संजीवा स्वामी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक संजीवा लेझीम मंडळ यांच्या मनमोहक नाच गाण्यासह भजनी मंडळ व अनेक दिंड्या सह नाझरे गावातून निघणार आहे तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समर्थ संजीवा स्वामी महाराज आश्रम नाझरे वझरे तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा