Breaking News

१३ जून २०२५

महात्मा बसवेश्वराचा एक फूट उंचीचा अर्ध पुतळा मोफत देणार... - अध्यक्ष उत्कर्ष शेटे

सांगोला प्रतिनिधी 

       शिव निर्णय संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वराचा एक फूट उंचीचा अर्ध पुतळा लिंगायत समाज बांधवांना मोफत देणार असल्याचे शिव निर्णय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्कर्ष शेटे यांनी सांगितले. 

जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याची माहिती व स्मरण लिंगायत समाज बांधवास व्हावे यासाठी एक फूट उंचीचा आकर्षक रंगीत अर्ध पुतळा समारंभ पूर्वक मोफत देण्यात येणार आहे. या अंतर्गत इच्छुकांच्या ऑनलाईन माहिती भरावयाच्या नोंदणी पत्रक लिंकचे उद्घाटन शिवरत्न बंगला येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी खासदार ध्येयशील मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, सयाजी राजे मोहिते पाटील यांना माहिती देऊन शिवभक्त लिंक शेअर करण्यात आली. यावेळी शिव निर्णय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्कर्ष शेटे, चंद्रकांत नाना कुंभार, अरुण तोडकर, महेश शि. शेटे, उमेश गुळवे, राजू गाढवे, महेश डिकोळे, मंगेश नाना शेटे व समाज बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा