गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे लातूर येथे प्रबोधन
श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरले आहे व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचा सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे.
जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचाच नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होते व यासाठी श्री राम लिंगेश्वर मंदिर काळे गल्ली लातूर येथे रविवार दिनांक 4 मे रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामीभक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत