Breaking News

माळेवाडी ता. सांगोला येथील अवैध्य दारु आड्यावर छापा टाकुन केला २,५८,७२०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत


 

सांगोला/ प्रतिनिधी: 

सांगोला पोलीस ठाणे हददीतील नाझरा शिवारात माळेवाडी येथे एक इसम पत्रा शेडमध्ये अवैध दारूची विक्री करीत आहे.   गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. सर्व पोलीस अंमलदार हे नाझरा शिवारातील माळेवाडी येथे जावुन रोडच्या बाजुला वाहने लावुन थांबले. सदर ठिकाणी पत्राशेडच्या समोर एक इसम उभा असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले तेव्हा पोलीसांनी त्याचा संशय आल्याने त्यास जागीच गराडा घालुन पकडले व त्यास नाव गाव विचारले असता त्यांना आपले नाव सतिश सदाशिव आदटे वय ४३ वर्षे रा-नाझरा ता. सांगोला असे असल्याचे सांगितले त्यावेळी पोलीसांनी पत्राशेडची झडती घेतली असता खालील अवैध्य प्रोव्हीबिशन माल मिळुन आलेला आहे. 2,58,720/- देशी विदेशी कंपनीचे ७७ बॉक्स अवैध्य दारु 2,58,720/- रुपयाचा मुद्देमाल आरोपीतांचे ताब्यात मिळाला असुन तो श्रेणी पोसई हिप्परकर यांनी पंचासमक्ष ताब्यात घेवुन जागीच जप्त केलेला पो. हेड कॉन्स्टेबल सदाम रसुल नदाफ यांनी सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद दाखल केलेली आहे.

सदरची कामगिरी मा.श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, मा.श्री प्रितम यावलकर सो, अपर पोलीस अधिक्षक सो, सोलापुर ग्रामीण मा. श्री विक्रांत गायकवाड सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, मंगळवेढा, यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक विनोंद घुगे सांगोला पोलीस ठाणे, श्रेणी पोसई हणमंत हिप्परकर, पोकों सद्दाम नदाफ, पोकों धुळदेव चोरमुले यांनी सदरची कारवाई केली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोसई हिप्परकर करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत