नऊदारे येथे बुद्ध विहारांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका , ग्रंथालय उद्घाटन संपन्न.
विशेष प्रतिनिधी , संतोष कदम.
वालचंदनगर , प्रज्ञासुर्य,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवा निमित्त नऊदारे येथिल "बुद्धविहारा मध्ये" बुद्धविहार व्यवस्थापन समिती संचलित, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतीबा फुले अभ्यासिका/ग्रंथालय सुरु करण्यात आले.
याचे उद्घाटन विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी मा.सचिनजी बनसोडे साहेब (राज्यकर उपआयुक्त महाराष्ट्र), डॉ बाबासाहेब कांबळे (MD देसाई हॉस्पिटल)
डॉ. देसाई (देसाई हॉस्पिटल चे सर्वेसर्वा)प्रा.सर्वगोड सर,
मा.सौरभजी आवाड साहेब (SBI मॅनेजर)
मा.प्रशिक जाधव साहेब (महाराष्ट्र पोलिस),अमोल पवार (औषध निर्माते प्रा.अ.कें लासुर्णे)मा.अतुलजी सावंत (कार्यकारी सरपंच कळंब) मा.नेताजी लोंढे मा.तं.मु.स.अध्यक्ष,लासुर्णे
मा.माऊली मेटकरी ग्रा.स.कळंब
मा.अजिजभाई मुलाणी लासुर्णे
उपस्थित होते.
तसेच स्थानिक आणि परिसरातील बहुसंख्य बांधव उपस्थित होते.
या जयंतीदिनानिमित्त सुरू केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका / ग्रंथालय यामुळे परिसरातील शालेय विद्यार्थ्यांबरोबर ग्रंथ वाचकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे परिसरामधून बुद्ध विहार व्यवस्थापन समितीचे कौतुक केले जात आहे.
विशेष सहकार्य -राहुल तरुण मित्र मंडळ नऊदारे यांचे लाभले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत