बारामती येथे एकच धून,1 जून 2025..विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती महोत्सव...! . विश्वपूजा,सदभावना रॅली आणि विश्व आरतीसाठी, पुरस्कार वितरण साठी सर्व समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन : बबन आटोळे सर ...!
विशेष प्रतिनिधी , संतोष कदम . बारामती :- दि ०१/०६/२०२५ रविवार रोजी शारदा प्रांगण,भिगवण चौक बारामती येथे सकाळी ११.०० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई, माता रमाई आंबेडकर यांची विश्वपूजा आयोजित केली आहे.कार्यक्रम रूपरेषाची माहिती संस्थापक अध्यक्ष बबन आटोळे सर यांनी दिली आहे.तीर्थप्रसाद व महाप्रसाद-सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० सदभावना रॅली(पुण्यश्लोक अहिल्यादेवी, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई, माता रमाई यांची सामूहिक)-सायंकाळी ४.०० वाजता पेन्सिल चौक पासून भिगवण चौक पर्यंत सदभावना रॅली काढण्यात येणार आहे. रॅली साठी स्वतः ची टू व्हिलर व फोर व्हिलर घेऊन येण्याचे आवाहन केले आहे. तद्नंतर सायंकाळी ६.३० वाजता विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विश्वआरती होणार आहे.त्यासाठी स्वतः चे आरतीचे ताट (कापूर) घेऊन येण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.सायंकाळी ६.४५ वा. प्रास्ताविक, सत्कार समारंभ, मनोगते आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे.स्नेहभोजन ही रात्री ८.०० ते रात्री ११.०० पर्यंत चालणार आहे.अशी माहिती संस्थापक अध्यक्ष बबन आटोळे सर यांनी दिली आहे.
वरीलप्रमाणे जागतिक जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी विश्वपूजा, सदभावना रॅली आणि विश्व आरतीसाठी, पुरस्कार वितरण साठी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी आपला बहुमोल वेळ काढून आपण उपस्थित रहाण्याचीही विनंती/आवाहन जागतिक महोत्सव जयंती समिती च्या वतीने करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत