राज्यस्तरीय आदर्श सरपंच सौ अनिता पवार यांचा नाझरे येथे सत्कार
नाझरे प्रतिनिधी
अजनाळे ता. सांगोला येथील विद्यमान सरपंच सौ अनिता चंद्रकांत पवार यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याने त्यांचा नाभिक समाज मंदिर नाझरे ता . सांगोला येथे भव्य सत्कार करण्यात आला.
सुरुवाती सर्वांचे स्वागत युवा नेते दादासो हरिहर यांनी केले. तर यावेळी शिक्षक नेते शिवभूषण ढोबळे यांनी सरपंच सौ अनिता पवार यांच्या कार्याचा आढावा सांगितला. तसेच मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यामुळे अल्पसंख्यांक समाजातून सौ अनिता पवार यांची सरपंच म्हणून निवड झाली व त्यामुळे पुरस्कार मिळाला असे पत्रकार रविराज शेटे यांनी यावेळी सांगितले. तर मला मिळालेला पुरस्काराचे सर्व श्रेय अजनाळे ग्रामस्थ, मा . सरपंच विजय दादा येलपले, व चंद्रकांत पवार सर यांना राहील व यापुढे आपण गावात वेगवेगळ्या योजना आणून विकास करू असे सत्कारमूर्ती अनिता पवार यांनी सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले.
सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सौ सीमा गेजगे, सेवा गेजगे महादेव भडंगे, मा. उपसरपंच बसवेश्वर आदाटे, पांडुरंग वाघमारे, समाधान वाघमारे, योगेश दादा देवकुळे, दीपक खंडागळे, आरिफ काजी, प्रकाश सोनवणे, सोमनाथ खंडागळे, फिरोज मुलानी, महादेव भडंगे इ. उपस्थित होते. सूत्रसंचालन व सर्वांचे आभार दादा सो हरिअर यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत