श्री काशी जगद्गुरु महास्वामीजी यांची लेंगरे येथे भव्य अड्ड पालखी सोहळ्याचे नियोजन
सांगोला प्रतिनिधी
लेंगरे ता. खानापूर येथे शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता श्री काशी जगद्गुरु महास्वामीजी यांच्या अड्डपालखी सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे माहेश्वर मूर्ती बसवेश्वर स्वामी यांनी सांगितले. तसेच सायंकाळी सात वाजता धर्मसभा व महाप्रसाद वाटप होईल.
शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता संगीतमय ईस्टलींग पूजा व 51 माहेश्वर मूर्ती स्वामी यांच्या हस्ते शिवमंदिर लेंगरे येथे रुद्राभिषेक संपन्न होईल. तसेच रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी परम रहस्य ग्रंथाचे पारायण व मंगळवार दिनांक 29 एप्रिल रोजी ग्रंथाची समाप्ती होईल.
बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत लेंगरे येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व सायंकाळी पाच वाजता शिवमंदिर येथे प्रतिमा पूजन व महाआरती होईल तरी शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वीरशैव समाज लेंगरे तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत