Breaking News

नाझरे महावितरण चा कारभार सुधारा अन्यथा ऑफिसला टाळे लावू...- अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे.....! विजेचा लपंडाव... शेतकरी, नागरिक, व्यापारी, महिला, विद्यार्थी हैराण.....! महावितरणच्या ढिसाळ नियोजनाविरुद्ध तीव्र संताप......!

सांगोला प्रतिनिधी 

      नाझरे गाव व परिसरात विजेचा गेली सुमारे चार महिने झाले लपंडाव सुरू असून, पाच पाच मिनिटाला लाईट जाते व येते व यामुळे शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, महिला वर्ग अक्षरशः हैराण झाला असून, ऐन उन्हाळ्यात उन्हाचा तडाका व विजेचा झटका त्यामुळे नाझरे महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात असून, यामध्ये दोन ते तीन दिवसात सुधारणा करा अन्यथा शुक्रवार 28 मार्च रोजी ऑफिसला टाळे लावू असा गंभीर इशारा बहुजन भारत सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे यांनी नाझरे येथील कार्यालयात निवेदनाद्वारे दिला आहे. 

      सध्या उन्हाळा कडक असून, दिवसेंदिवस तापमान वाढत आहे व नाझरे गावाला भगीरथ ची लाईट फक्त नावालाच आहे असे म्हणायचे व पाच पाच मिनिटाला लाईट घालवायची यास जबाबदार कोण. वीज नियामक धोरणानुसार ग्राहकांना वेळेत विजेची सेवा दिली पाहिजे असे बंधनकारक आहे व भरपाई मागण्याचा सुद्धा अधिकार आहे. ऐन परीक्षेच्या व काळात व कडक उन्हाळ्यात वीज सातत्याने गायब होत असल्याने, कारभार सुधारा अन्यथा नाझरे महावितरणास टाळे लावण्याचा इशारा सामाजिक संघटनेद्वारे दिला आहे. यावेळी नितीन वाघमारे, रोहन वाघमारे, दादासो वाघमारे व बहुजन भारत संघटनेचे सदस्य उपस्थित होते. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महावितरण ने मनमानी थांबवून सेवा द्यावी

    नाझरे गावात लहान, मोठे अनेक व्यवसाय असून ते विजेवर अवलंबून आहेत. सध्या पिठाच्या चक्की मध्ये दळण टाकले की लाईट जाते व सतत होत असल्याने पिठामध्ये खर येते व त्यामुळे नागरिक, महिला ओरडतात व त्यांची बोलणी आम्हास खावी लागते. व त्यामुळे पिठाच्या चक्कीवरही याचा परिणाम होत आहे. तसेच यापूर्वी व्यापारी वर्गाने महावितरण चा कारभार सुधारा असे निवेदन मागील दोन महिन्यात दिले होते परंतु काही झाले नाही तरी मनमानी थांबून सेवा द्यावी. 

      संतोष रायचुरे

नाझरा फ्लोअर मिल संघटना

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत