शेरसुहास मित्रमंडळाकडून बारामती शहरात इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न
प्रतिनिधी, संतोष कदम.
बारामती : येथील मानव एकता युवक संघटना, शेरसुहास मित्रमंडळ आणि भारतदादा अहिवळे युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि. २४) रोजी आमराई परिसरातील महात्मा फुले नगर येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी मुस्लिम बांधव आणि महिलांसह बहुजन समाजातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या देशात आणि राज्यात काही शक्तींकडून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात असून, यामुळे आपल्या देशाची अखंडता आणि सामाजिक बांधिलकी धोक्यात आली आहे. आपल्या देशातील सर्व समाजांमध्ये असलेले सामाजिक ऐक्य आणि सामाजिक
सलोखा अबाधित ठेवण्यासाठी आपण गेल्या पाच वर्षांपासून या इफ्तार पार्टीचे आयोजन करत असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक ॲड.सुशील अहिवळे आणि शुभम अहिवळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण माजी नगरसेवक असिफ खान,सत्यव्रत काळे,प्रा.रमेश मोरे,अॅड.अब्दुलकरीम बागवान,अल्ताफ बागवान,तैनूर शेख,प्रकाश टेमघर,प्रा.नागेश लामतुरे,इम्रान पठाण,सिकंदर शेख,दाऊद शेख,गौतम शिंदे, सोमनाथ रणदिवे,बबलू जगताप आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिलाल बागवान,सिद्धार्थ लोंढे,नितीन गव्हाळे,अशपाक सय्यद,रितेश गायकवाड,रफिक शेख,विजय मागाडे,सुरज जाधव,रोहित वाघमोडे यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत