Breaking News

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अजनाळे येथे ग्रामपंचायतीच्या वतिने विनम्र अभिवादन..

 


सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
सांगोला तालुक्यातील अजनाळे ग्रामपंचायत कार्यालय येथे अज्ञान अंधश्रद्धा आणी अस्वच्छतेचे महत्व समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अजनाळे गावच्या विद्यमान सरपंच अनिता पवार यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य महादेव भंडगे, चंद्रकांत पवार, सर्जेराव धांडोरे, राणी पोतदार, प्रशांत बनसोडे, महेश चव्हाण, सचिन राक्षे, अक्षय भंडगे, योगेश देशमुख यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत