Breaking News

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत अजनाळे गावातील ३८ घरकुल मंजूर; ग्रामपंचायत अधिकारी संदिप सरगर मंजुर लाभार्थ्यांना सहकुटूंब आमंत्रित करून देण्यात येणार मंजुरी पत्र व पहिला हप्ता होणार वितरण ...


सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

मा ना अमित भाई शहा, केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मा.ना देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत २० लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र व दहा लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०४:४५ वाजता मुख्य बॅडमिंटन हॉल श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. 

सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने अजनाळे ग्रामपंचायतीच्या वतीने दुपारी ठिक 03:00 वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन ग्रामपंचायत सभागृह  येथे करण्यात आलेले आहे. सदर सभेमध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गावातील ३८ लाभार्थ्यांना सहकुटुंब आमंत्रित करून घरकुल मंजूर पत्र व पहिला हप्ता वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी संदिप सरगर यांनी दिली आहे.

या वेळी घरकुल लाभार्थ्यांसमवेत  ग्रामपंचायत स्तरावरून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या गृहोउत्सवाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून घरकुल लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,सर्व पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ घरकुल लाभार्थ्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आव्हान ग्रामपंचायत अधिकारी संदिप सरगर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत