Breaking News

१९ फेब्रुवारी २०२५

पायोनियर स्कूल य. मंगेवाडी मध्ये शिव जयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा


सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर पब्लिक (सी बी एस ई) स्कूल, पायोनियर इंग्लिश मिडियम स्कूल आणि पायोनियर निवासी गुरुकुल य. मंगेवाडी मध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले स्वराज्याची स्थापना करणारे श्री शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा झाला. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अनिल येलपले सर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व विभागाचे विभाग प्रमुख व सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या देखरेखी खाली कार्यक्रम थाटात पार पडला. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन सौ संध्या प्रशांत मगर मॅडम यांनी केले तसेच श्री समाधान येलपले सर यांनी शिवगर्जना प्रस्तुत केले. विद्यार्थ्यांनी शिवरायांची गाथा आपल्या बोबड्या व परखड बोलीत मांडली. काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून  शिवरायांविषयी प्रेम व्यक्त केले. प्रशालेच्या शिक्षकांनीही आपले शिवरायांविषयीचे विचार व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे नेहमीच सर्वांना पाठीवर प्रेरणेचा हात ठेवून अग्रेसर करतात त्यांनी ही शिवरायांचा जीवनपट सांगून मुलांमध्ये  उत्तेजना निर्माण केली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परवीन तांबोळी मॅडम यांनी केले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा