Breaking News

१२ जानेवारी २०२५

,निमगाव केतकी येथे सत्यशोधक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रमाता माॅ.साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

         निमगाव केतकी  (दि. १२) राष्ट्रमाता  जिजाऊ यांची ४२७ वी जयंती  सत्यशोधक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री संत सावता माळी चौक येथे  साजरी करण्यात आली. तसेच सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने देखील राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता  जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  संजय राऊत  व सुमेध साबळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.  

              बहुजन समाज पार्टीचे माजी प्रदेश सचिव अजित ठोकळे, बाबासाहेब भोंग, सुहास जाधव, शंकर ननवरे, माणिक ननवरे, मुकुंद पाटील, मिरगणे गुरुजी, नामदेव हेगडे, भीमराव बोराटे, कपिल हेगडे, एडवोकेट श्रीकांत करे, एडवोकेट सचिन राऊत, सुभाष भोंग, एडवोकेट रोहित लोणकर, पप्पू कोळी,मयूर शिंदे प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय मिसाळ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष हेगडे यांनी केले तर आभार प्रतिष्ठानचे प्रदेश सचिव प्रवीण डोंगरे यांनी मांनले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा