सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य क्रिडा दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत य. मंगेवाडी आयोजित तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत पायोनियर पब्लिक ( CBSE) स्कूल, पायोनियर इंग्लिश मिडीयम स्कूल व पायोनियर निवासी गुरुकुल य. मंगेवाडी शाळेच्या खेळाडूंनी आपल्या यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश मिळवून शालेय क्रिडा क्षेत्रातील आपला दबदबा कायम राखला.
श्री खंडोबा मैदान य. मंगेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पायोनियर शाळेच्या १० वर्षे वयोगट मुली मध्ये आर्या दिपक कोळवले ६० मिटर धावणे मध्ये तृतीय , १४ वर्षे वयोगट मुली
गोळा फेक मध्ये श्रद्धा रमेश तंडे( प्रथम ) श्रावणी राहुल येलपले (तृतीय) १०० मी धावणे मध्ये श्रध्दा रमेश तंडे ( तृतीय )लांब उडी मध्ये सई किशोर गडहिरे (प्रथम) तनिष्का तानाजी केंगार (द्वितीय)१७ वर्षे वयोगट मुली मध्ये लांब उडी मध्ये प्रणिती राजेंद्र पवार ( प्रथम)निधिशा संभाजी बाबर ( द्वितीय)भाग्यश्री पांडुरंग पवार ( तृतीय)८०० मिटर धावणे मध्ये श्रावणी अतुल कंड्रे (प्रथम ) समता दत्तात्रय कुटे ( द्वितीय )प्रणिती राजेंद्र पवार ( तृतीय)हातोडा फेक मध्ये मोहिनी राजेंद्र सूर्यवंशी(द्वितीय )पल्लवी दत्तात्रय येलपले ( तृतीय)गोळा फेक मध्ये १९ वर्षे मोहिनी राजेंद्र सूर्यवंशी ( तृतीय )हातोडा फेक मध्ये पायल रामचंद्र येलपले ( द्वितीय )थाळी फेक पायल रामचंद्र येलपले ( तृतीय )लांब उडी मध्ये श्रवंतिका रमेश लिगाडे (द्वितीय)श्रावणी अतुल कंड्रे ( तृतीय ) ८०० मिटर धावणे श्रवंतिका रमेश लिगाडे(प्रथम)तनिष्का लक्ष्मण विभुते ( तृतीय ) अशा प्रकारे मुलींनी यश मिळविले
मुलांमध्ये १० वर्षे वयोगट मध्ये चेतनसिंह अनिल पवार ६० मिटर धावणे प्रथम , १२ वर्षे वयोगट गोळा फेक मध्ये संकल्प छगन येलपले प्रथम
१७ वर्षे वयोगट मुले थाळी फेक -
ऋषिकेश रामचंद्र येलपले द्वितीय,
रितेश अरविंद ठेंगल तृतीय, गोळा फेक मध्ये ऋषिकेश रामचंद्र येलपले द्वितीय हातोडा फेक मध्ये रितेश अरविंद ठेंगल प्रथम, ऋषिकेश रामचंद्र येलपले द्वितीय लांब उडी मध्ये सुशांत मारुती कुलाळ तृतीय.१९ वर्षे वयोगट मुलामध्ये लांब उडी मध्ये ओम नानासो कदम द्वितीय, हरीश शिवाजी पाटील तृतीय. ८०० मिटर धावणे मध्ये यश बबन कदम द्वितीय हरीश शिवाजी पाटील तृतीय १०० मिटर धावणे - करण महादेव कोडग प्रथम , हर्ष प्रविण येलपले द्वितीय ,लांब उडी मध्ये करण महादेव कोडग प्रथम ,ओम दादासो विभुते द्वितीय क्रमांक अशा प्रकारे मुलांनी देखील क्रिडा स्पर्धेत आपली क्षमता सिद्ध केली.
पायोनियर स्कूलच्या खेळाडूंना संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर , क्रिडा शिक्षक , सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंनी क्रिडा स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून खेळाडूंचे व शाळेचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा