Breaking News

विचार कल्पना मत भावना कवेत घेते ती कविता असते- मा.अनिल उदावंत.


 प्रतिनिधी - संतोष कदम.

पुणे- हडपसर येथील साहित्य सम्राट संस्था पुणे व डॉ. समीर बोराटे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने काव्य मैफिल आयोजित करण्यात आली होती या काव्य मैफिलचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनिल उदावंत प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कविवर्य गोविंद पाटील गावशिवारकर,  डॉ. मंगेश बोराटे, विनोद अष्टुळ संस्थापक अध्यक्ष साहित्य सम्राट संस्था हे उपस्थित होते .

    काव्य मैफिलीचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार मान्यवरांच्या शुभहस्ते अर्पण करण्यात आला.

प्रास्ताविक डॉ. मंगेश बोराटे यांनी केले .मान्यवरांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ, दिवाळीअंक देऊन सन्मानित करण्यात आले .

काव्य मैफिलित डॉ.बळीराम ओहोळ, प्रा. उध्दव महाजन , संदीपान पवार, दशरथ दुनघव ,दीपाली खामकर ,प्रेम ताम्हणे, प्रल्हाद शिंदे, प्रा.सूर्यकांत नामगुडे, किशोर टिळेकर, प्राजक्ता ताम्हणे , अनिता उदावंत, अलका जोगदंड, विनोद ताम्हणे, डॉ.आरती अंभोरे, डॉ. मनोज लडकत, प्रविण वानखेडे, संदीप झगडे, डॉ. प्रतिक राऊत, गणेश गायकवाड, संजिवनी जगताप, डॉ.रसिक झांजे, सचिन नागापूरकर, श्रीकांत वाघ, रामचंद्र मोरे या सर्व मान्यवर   कवीने प्रेम, पावसाळा, आई ,बाप ,गोतावळा, देशप्रेम ,महापुरुषांच्या कविता ,बायको ,गझल, लावणी, विनोदी विडंबन, कविता, चारोळ्या, जगणं मरण, कर्ज ,अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक विषयांवर मार्मिक वैचारिक भाष्य करत काव्य मैफिलीची रंगत वाढवली. यावेळी साठ कवींनी रचना सादर केल्या. या काव्य मैफिलचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या शीघ्रशैलीत चारोळ्या विनोदी चुटके शेरोशायरी दमदार आवाजात बहारदार दमदार चोख भूमिका पार पाडली .

अध्यक्षिय भाषणात मा. अनिल उदावंत म्हणाले, दिसामाजी लिहिले पाहिजे धडपड केली तरच नवोदित कवी प्रस्थापित कवी होतील कविता जगता आली तर धाडस जिद्द चिकाटी आणि वास्तव दर्शन घडविणारी रचना लिहिली तर समाजासमोर आपले विचार प्रगट केले तरच आपली कविता जगता येईल आपले विचार कल्पना मत भावना कवेत घेते ती कविता असते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचा समारोप विनोद अष्टुळ यांनी आभार मानले .हडपसर येथील भेकराईनगर येथील बोराटे हॉस्पिटलमध्ये काव्य मैफिल संपन्न झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत