जनक्रांती श्रमिक कामगार संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी पत्रकार सुनील चांदणे यांची निवड
..
प्रतिनिधी - संतोष कदम.
दि. 28/10/24 रोजी जनक्रांती संघटना तथा श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवराज मुळे यांच्या मार्गदर्शनाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सुनील चांदणे पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष सोलापूर यांची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष दयानंद राठोड, मा. शिक्षण विस्तार अधिकार श्री .गोफने पाटील , पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र प्राध्यापक सुरेश वाळेकर, ब्लू स्टार संघटना राष्ट्रीय सरचिटणीस वीर सकट , ग्रामपंचायत सदस्य उमेश वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये लातूर येथील अपारमेंट मध्ये निवडीचे पत्र देण्यात आले. जनक्रांती श्रमिक कामगार संघटना ही या महाराष्ट्रभर कार्यरत असून बांधकाम कामगार, इतर कामगार मजूर यांच्या समस्या सोडवून आर्थिक सामाजिक आरोग्य प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेऊन काम करत आहे. बांधकाम व इतर कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आर्थिक, शैक्षणिक व आरोग्य याचा लाभ मिळवून देत असून कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कामगारांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी नियुक्ती पत्र देऊन सोपवली असून संबंधित अधिकारी, कर्मचारी कामगार यांनी सहकार्य करून संघटना बळकटीकरण करावी असे आवाहन करण्यात येते. सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार, कामगार, मित्र परिवार, पे टू पे सोशल फाउंडेशन परिवार यांनी आनंद व्यक्त केला असुन पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत