Breaking News

०६ सप्टेंबर २०२४

पशुसंवर्धन विभागाने य मंगेवाडी गावातील जनावरांना लसीकरण करावे:युवा नेते तेजस कोकरे यांची मागणी


 अजनाळे: सचिन धांडोरे: आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत लंपी , अंगावर फोड येणे,ताप येणे,घसा दुखणे, घटसर्प सारखे जनावरांना हजर होण्याची शक्यता असते परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पशुसंवर्धन विभागाकडून य मंगेवाडी गावातील  जनावरांना लसीकरण केले परीनामी गावातील जनावरांना लंबी आजाराची लागण झाले असून तरी वेळीच पशुसंवर्धन विभागाने लक्ष  घालून लवकरात लवकर लसीकरण करावे अशी मागणी युवा नेते तेजस कोकरे यांनी केली आहे.

पावसाळ्याच्या कालावधीत गाय, म्हैस, जर्सी गाय यासारख्या जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची अधिक भीती असते या जनावरांना वेळीच उपचार न झाल्यास पशुधन दगावले जाऊ शकते त्यामुळे हे आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण करणे गरजेचे आहे.

य मंगेवाडी गावातील शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात जर्सी गाय, म्हैस  यासारखे पशुधन मोठ्या प्रमाणात गावात असून या जनावरांना  कोणत्याही आजाराची लागण होऊ नये म्हणून शेतकऱ्याकडून काळजी घेतली जात आहे परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जनावरांना ताप येणे, चारा कमी खाणे, इत्यादी लक्षणे जनावरांमध्ये दिसून येत असल्याने पशुसंवर्धन विभागाने गेल्या तीन ते चार महिन्यापासून यलमर मंगेवाडी गावामध्ये कोणत्याही प्रकारचे लसीकरण केले नाही तरी गावातील संपूर्ण पशुधनाला लसीकरण करावे अशी मागणी गावातील शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा