Breaking News

१५ सप्टेंबर २०२४

पोपट मोरे गुरूजी आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित...


 अजनाळे: सचिन धांडोरे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवाडी येथे  कार्यरत असलेले पोपट लक्ष्मण मोरे यांना सूर्योदय फाउंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ग्रामीण साहित्यिक इंद्रजीत भालेराव, सूर्योदय उद्योग समूह संस्थापक अनिल भाऊ इंगोले,चेअरमन. सूर्योदय अर्बन जगन्नाथ भगत गुरुजी, व्हा चेअरमन सुभाष दिघे गुरुजी, चेअरमन सूर्योदय दूध विभाग बंडोपंत लवटे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला.

 काल शनिवार दि १४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता आनंद लॉन्स वासद रोड सांगोला या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रम प्रसंगी निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकरराव जाधव, सह आयुक्त अन्न व औषध महाराष्ट्र राज्य उल्हास इंगोले, उपायुक्त राज्यकर महादेव लवटे, जिल्हाधिकारी अ नगर अभयसिंह मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी जत हिंदकेसरी सुनील साळुंखे,नगररचनाकार नगरविकास विठ्ठल धायगुडे, न्यायालय आयुक्त डॉ संतोष राऊत, कक्ष अधिकारी सुमित शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भोसले, वित्त व लेखा अधिकारी संदीप पाटील, उपशिक्षण अधिकारी मयूर लाडे, परिविक्षा अधिकारी दीपक धायगुडे,सह  प्राध्यापक डॉ महेश इंगोले, पशुधन विकास अधिकारी डॉ विनोद थोरात, पशुधन विकास अधिकारी  विक्रम शिंदे, सह पोलीस निरीक्षक कविता रुपनर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री गायकवाड, राज्य टॅक्स इन्स्पेक्टर धनपाल गुरव यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोपट मोरे गुरूजी  यांनी सह  शिक्षक ते मुख्याध्यापक पदापर्यंत विविध शाळेमध्ये चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन सूर्योदय फाउंडेशन यांच्यावतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा